solicitation certificate affidavit format in Marathi, सॉंलन्सी सर्टिफिकेट ऐपतीचा दाखला affidavit, सॉंलन्सी प्रतिज्ञापत्र, ऐपतीचा दाखला मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे,
परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहोत. आपल्याला तर माहित चा असेल कि सॉंलन्सी किंवा ऐपतीचा दाखला किती महत्वाचा आहे. तर आपण या पोस्ट मध्ये या बद्दल माहिती पाहणार आहोत. आपण सॉंलन्सी किंवा ऐपतीचा दाखला आपण कशा काढू शकतो व हा दाखला काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागते व कोणते कागदपत्र लागते व या साठी लागणारे शपतपत्र फॉरमॅट मराठी मध्ये घेऊन आलो आहेत. व आपल्यला माहिती असेल कि कोर्ट मध्ये आपल्याला कोणाची जमीन घेण्याची असेल आणि जज साहेबानी १५००० रु वरील जमीन दिलेली असेल तर आपल्याला सॉंलन्सी ची गरज पडते व यालाच ऐपतीचा दाखला सुद्धा म्हणतात व आणखीन काही सरकारी किंवा खाजगी किंवा शासकीय कामाच्या निविदा किंवा इ टेंडर इत्यादी करीत सॉंलन्सी किंवा ऐपतीचा दाखला ची गरज पडते.
solicitation certificate affidavit format in Marathi
सॉंलन्सी किंवा ऐपतीचा दाखलावर व्यक्तीची संपत्तीचे मुल्याकंन valuation दिलेले असते. या मध्ये वक्तीचे शेतजमीन घर इमारत किंवा आपल्या कडे जी काही प्रॉपर्टी असते याचा समावेश या मध्ये असतो. आपण हा दाखल जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी तथा तहसीलदार याच्या कडून प्राप्त करू शकता.
solicitation-certificate-affidavit-format-in-Marathiप्रतिज्ञापत्र
मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी ………… यांचे समोर
विषय :- ऐपतीचे प्रमाणपत्र (सॉंलन्सी) मिळणे बाबत…
मी :- ………………………………………………
वय :- ३६ वर्ष
धंदा :- शेती
राहणार :- रा………………… ता ………………… जी ……………….
सत्य प्रतिज्ञे वर लिहून देतो / देते कि, माझे गाव मैजे ……………. ता …………… जी…………… असून माझी जमीन मैजो …………… ता …………….. जी ………….. शिवारात आहे. सदर जमिनीचा गट / सर्वे नं………….. असून त्याचे एकूण क्षेत्र ….. हे ….. आर आहे. त्याची बाजार भावाने अंदाजे किंमत ……………………………./- रुपये आहे. तरी मला जमीन/शासकीय कामे ………………………./- अक्षरी …………………………………………………………………. रुपयाची सॉंलन्सी सर्टिफिकेट मिळावे त्याकामी सत्य प्रतिज्ञेवरून लिहून दिले आहे. सदर मिळकत कोणास गहाण व दान केलेली नाही. सोबत ७/१२ हा उतारा जोडत आहे.
प्रतीज्ञावरील सर्व मजुकर सत्य व खरा आहे मजकूर खोटा आढळून आल्यास भारतीय दंड विधान संहिता (आय पी सी) कलम १९९ व २०० नुसार शिक्षेस पत्र राहील.
हे प्रतिज्ञापत्र
ओळख/साक्षीदार
सही :
नाव :
पत्ता : प्रतिज्ञा करणाची सही
…………………………………………
सॉंलन्सी किंवा ऐपतीचा दाखला मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज रु १०/- च्या कोर्ट फी स्टॅम्प सह.
- तीन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो.
- संबंधित जमीन चा गाव नमुना किंवा ७/१२ उतारा.
- इमारत असल्यास ग्रामपंचायत / महानगर पालिका / नगर पालिका मालमत्ता रजिस्टर चा उतारा किंवा कर पावती किंवा आखीव पत्रिकेची प्रत.
- इमारत किंवा घरासाठी महानगर पालिका / नगर पालिका यांच्या अभियंता चा मुल्याकंन अहवाल .
- शेतजमीन असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रमाणपत्र. (शीघ्र सिद्ध गणकानुसार होणारे जमिनीचे प्रमाण पत्र)
- शेतजमीन असल्यास संबंधित मंडळ अधिकारी यांचा मूल्यांकन अहवाल .
- १०० रु स्टॅम्प पेपर वर शपतपत्र .
- तहसीलदार यांचा उक्त स्थरावर मालमत्ता गहाण नसलेला बाबत अभिप्राय सह अहवाल.
जर आपल्याला या बद्दल आणखीन माहिती हवी असेल तर येथे क्लीक करा.