Police Verification form online Apply in Marathi, character certificate maharashtra police, पोलीस व्हेरिफिकेशन कसे काढावे, पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
नमस्कार मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये पोलीस व्हेरिफिकेशन कसे काढावे या बद्दल माहिती देणार आहोत. व हा डोकमेण्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात या बद्दल पण माहिती घेणार आहोत. आपण महाराष्ट्र मध्ये राहत असेल तर आपल्यला या प्रमाणपत्राची गरज पडते. तर हे प्रमाणपत्र कडण्यासाठी काय प्रोसेस आहे. त्या साठी काय करावे कोणत्या साईट वर हा फॉर्म भरावा अशी भरपूर माहिती या पोस्ट मध्ये आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहू.
Police Verification form
Police Verification form online Apply in Marathi
चला तर बघू कि पोलीस व्हेरीफिकेशन हा डोकमेण्ट ऑनलाईन कसे काढतात. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ६ स्टेप आहेत खाली दिलेल्या माहिती नुसार आपण त्या ६ स्टेप करा. महाराष्ट्र पोलीस क्लीरेन्स सर्विस हि या फॉर्म साठी ऑनलाईन वेबसाईट आहे.

पोलीस व्हेरिफिकेशन कसे काढावे
पहिली पायरी (Registration)
सर्वात पहिले https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Registration.aspx या साईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या. त्या मध्ये खाली दिलेली माहिती भरा.
- आधार नंबर
- आडनाव इंग्लिश व मराठी मध्ये
- पहिले नाव म्हणजे ज्या व्यक्ती चा पोलीस व्हेरिफिकेशन काढायचे त्याचे नाव.
- वडिलांचे नाव
- जन्म तारीख
- जवळील पोलीस स्टेशन सेलेक्ट करा.
- मोबाईल नंबर टाका
- पासवर्ड टाकून सबमिट करा.
दुसरी पायरी (Login)
रजिस्ट्रेशन झाले कि https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx या लिंक वर क्लीक करा.
- आपल्या समोर वेबसाईट ओपन होईल
- त्या मध्ये सर्वात पहिले मोबाईल नंबर टाका
- रजिस्ट्रेशन करता वेळी जो पासवर्ड टाकला होता तो टाका
- कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा
तिसरी पायरी (Fill Application)
- आता तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन मेन फॉर्म भारत आहेत त्या मध्ये खाली दिलेली माहिती भरा.
- सामान्य माहिती
- सध्याचा निवासी पत्ता
- मूळ / कायमचा पत्ता
- ज्या ठिकाणी तुम्हला हे प्रमाणपत्र जमा करायचे आहे त्याचा नाव पत्ता टाकायचा
- तुम्ही १० वर्ष जिथे राहता त्या ठिकाणचा पत्ता टाका
- तुमच्या परिसरातील दोन व्यक्तींचे नाव, पत्ता ज्यांना तुम्ही ओळखता
- जवळच्या पोलिस स्टेशनचा पत्ता टाका
- हि पूर्ण माहिती भरल्या नंतर फॉर्म सबमिट करा
चौथी पायरी (Pay Fees)
- फॉर्म सबमिट केल्यावर डाव्या बाजूला पेयमेन्ट करायचे ऑप्सशन आहे
- त्यावर क्लीक करा
- व १२६.६० रु पेयमेन्ट करा पेयमेन्ट झालं कि तुमचा फॉर्म सबमीट होईल
पाचवी पायरी (Verification by local Police station)
- पेयमेन्ट केल्यावर आपण ज्या जवळील पोलीस स्टेशन फॉर्म मध्ये दिलेले आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेटा
- तेथील कर्मचारी आपला फॉर्म बघतील व आपल्यावर काही गुन्हा नसेल तर SP ऑफिस ला पाठवतील
सहावी पायरी (Verification by CFC)
- आपल्यला मोबाईल वर संदेश येईल
- तो संदेश आला कि आपले पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तयार झाले
- ते आपण आपल्या जिल्हयातील SP ऑफिस येथे भेटेल
पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र कागदपत्रे
- आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदार
- ओळख पुराव्यासाठी कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी कोणीही)
- निवासी पुराव्यासाठी इलेक्ट्रिक बिल/टेलिफोन बिल (यापैकी कोणीही)
- एक पासपोर्ट आकाराचा फोटो
तर मित्रानो कशी वाटली हि पोस्ट नक्की कंमेंट करून सांगा आणि हो या वेबसाईट वर आणखीन पोस्ट आहे ते पण बघा जसे कि Vanshavali Praman Patra pdf Marathi जर अपल्याला या बद्दल आणखीन माहिती हवी असेल तर खाली दिलेला विडिओ पहा.
Pingback: Maharashtra District List Map PDF - Indian Document