नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक पात्रता व आवश्यक कागदपत्रे, nagar palika election documents required in marathi, nomination of candidates panchayat election, nagarsevak election nomination form maharashtra
नमस्कार मित्रानो आपण आज या पोस्ट मध्ये खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारत एक लोकशाही देश आहे. आणि ज्या देशामध्ये लोकशाही असली म्हणजे निवडणूक तर होणारच यामुळे आपण या पोस्ट मध्ये नगर पालिका व नगर पंचायत इलेकशन च्या बद्दल चर्चा करणार आहोत. आपण या पोस्ट मध्ये या निवडणूक मध्ये उमेदवार होण्यासाठी कोणते कागदपत्रे व काय पात्रता आहे आणि या साठी लागणार फॉर्म सुद्धा या पोस्ट मध्ये देणार आहेत. आपण या वेबसाईट वर Gram Panchayat Election Form pdf in Marathi हा सुद्धा फॉर्म दिलेला आहे तो पण आपण नक्की पहा.
Nagar Parishad And Nagar Panchayat Election Nomination Form
खाली दिलेल्या pdf मध्ये आपल्यला Nagar Parishad And Nagar Panchayat Election साठी फॉर्म आहे. त्या मध्ये आपल्यला सर्व शपत पत्रे दिलेले आहे. आपण या एक फॉर्म ची प्रिंट घेऊन हा फॉर्म भरू शकता. हा फॉर्म पूर्ण पाने मराठी मध्ये आहे.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक पात्रता व आवश्यक कागदपत्रे
या निवडणुकी बद्दल अधिक माहिती साठी आपण state election commission maharashtra या साईट वर जाऊन आणखीन माहिती घेऊ शकता किंवा नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक आपले काही प्रश्न असेल तर आपण हि FAQ Pdf पाहू शकता. त्या मध्ये या निवडणुकी बद्दल चे आपले प्रश्न किलर होतील. आणखीन काही अडचण येत असेल तर आम्हला नक्की कंमेंट करून सांगा आम्ही आपल्या अडचणी चे निवारण नक्की करू.
पात्रता
नगर परिषद किंवा नगर पंचायत खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- उमेदवारी अर्ज सादर करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या अंतिम दिनांकास त्या व्यक्तीच वय २१ वर्ष असणे आवश्यक आहे.
- नगरपरिषद किंवा नगर पंचायतीच्या सध्या च्या मतदार यादी मध्ये नाव असणे आव्यश्यक आहे.
- कोणत्याही कायद्याखाली पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरविल्यात आले नसावे.
- उमेदवार हा ज्या राज्या मध्ये अर्ज करतो त्या राज्याचा रहिवासी पाहिजे.
- उमेदवार याला दोन वर्ष कोणतेही न्यायालयीन शिक्षा झाली असेल तर ती शिक्षा पूर्ण होऊन ५ वर्ष नंतर अर्ज करू शकता.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा कोणत्याही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीत नसला पाहिजे
- उमेदवार कडे नगर परिषद किंवा नगरपंचायतीची कोणतीही थकबाकी नाही पाहिजे.
- उमेदवारांनी नगरपरिषद किंवा नगरपंचायतीतील कंत्राट घेतलेले नाही पाहिजे.
- १२ संप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या दोन पॆक्षा अधिक नाही पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
- उमेदवारी अर्ज
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदार यादीत नाव असलेले पान (झेरॉक्स)
- जात प्रमाणपत्र (कास्ट) राखीव जगासाठी
- उपरोक्त अधिनियमास अनुसरुन दिलेले जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जातीची वैधता तपासणीकरिता जात वैधता पडताळणी समिती कडे अर्ज केल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. (निवडून आल्यानंतर 12 महिन्याच्या आत सादर करावयाची हमीपत्र. (राखीव जगासाठी)
- अपत्याचे स्वंय घोषणापत्र.